लाभार्थी
१) १५-४९ वर्ष वयोगटातील महिला व किशोरवयीन मुलीं, गर्भवती महिला, स्तनदा माता
२) ० ते ६ वर्ष वयोगटातील बालके
वर्णन
पोषण अभियान हा ०-६ वर्ष वयोगटातील बालके, गरोदर महिला आणि स्तनदा मातांसाठी पोषण परिणाम सुधारण्यासाठी देशातील सर्व राज्यांमध्ये सन २०१८ पासून अंमलबजावणी करण्यात येत आहे. मार्च २०१८ मध्ये सुरू करण्यात आलेला, हा कार्यक्रम किशोरवयीन मुली आणि गर्भवती स्त्रियांवर लक्ष केंद्रित करून लहान मुलांमधील वाढ, कुपोषण, अशक्तपणा आणि जन्मतः कमी वजन, या सर्व बाबी सुधारण्याकरिता तंत्रज्ञान, लक्षित दृष्टिकोन आणि अभिसरण पद्धतीचा वापर करण्यात येतो. विविध तंत्रज्ञानाचा वापर करून सेवा वितरण आणि हस्तक्षेप सुनिश्चित करणे, अभिसरणाद्वारे वर्तणुकीतील बदल करून विशिष्ट लक्ष्य साध्य करणे हे या कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
त्याअनुषंगाने शासनाने दि. ११/०७/२०१८ च्या शासन निर्णयान्वये मान्यता दिल्यानुसार पोषण अभियानाची अंमलबजावणी राज्यातील ३६ जिल्हयातील ५५३ प्रकल्पांमधील सर्व अंगणवाडी केंद्रामध्ये सुरु आहे.
योजनेची उद्दीष्टे
अ. क्र.
|
उदिदष्टे
|
ईंष्ट्टांक
|
१
|
० ते ६ वर्ष बालकांमधील खुजे/ बुटके पणाचे प्रमाण कमी करणे
|
६% वरून प्रतिवर्ष २% प्रमाणे
|
२
|
० ते ६ वर्ष वयोगटातील बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी करणे
|
६% वरून प्रतिवर्ष २% प्रमाणे
|
३
|
६-५९ महिने वयोगटातील बालकांमधील रक्तक्षयाचे प्रमाण कमी करणे
|
९% वरून प्रतिवर्ष ३% प्रमाणे
|
४
|
१५-४९ वर्ष वयोगटातील किशोरवयीन मुलीं व महिलामधील रक्तक्षयाचे प्रमाण कमी करणे
|
९% वरून प्रतिवर्ष ३% प्रमाणे
|
५
|
जन्मत: कमी वजनाचे असणाऱ्या बालकांचे प्रमाण कमी करणे
|
६% वरून प्रतिवर्ष २% प्रमाणे
|
योजनेचे स्वरुप
वरीलप्रमुख उद्दिष्टांनुसार महाराष्ट्र राज्यामध्ये पोषण अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. याअंतर्गत उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शासनाच्या विविध विभागांचा समन्वय (convergence) करण्यात आलेला आहे. विविध विभागांच्या convergence मध्ये १) ग्राम विकास विभाग, २) सार्वजनिक आरोग्य विभाग, ३) पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, ४) नगर विकास विभाग, ५) आदिवासी विकास विभाग, ६) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM), ७) अन्न व औषध प्रशासन विभाग, ८)खाद्य पोषण आहार बोर्ड, ९) राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन इ. विभागांचा समावेश करण्यात आलेला आहे.
पोषण अभियानात प्रत्येक स्त्री आणि बालकांच्या निरंतर काळजीमध्ये दर्जेदार सेवांमध्ये प्रवेश सुनिश्चित करण्यात येते. विशेषतः मुलाच्या आयुष्याच्या पहिल्या १००० दिवसांमध्ये, अनेक दर्जेदार कार्यक्रम आणि योजनांचे अभिसरण सुनिश्चित केले जाते. सप्टेंबर महिन्यात पोषण माह व मार्च महिन्यात पोषण पखवाडा जनआंदोलन या उपक्रमाद्वारे पोषण अभियानात समुदायाला सहभागी करून जनजागृती केली जाते.
निकष / कार्यप्रणाली
पोषण अभियान अंतर्गत ठरविण्यात आलेली उद्दिष्ट गाठण्यासाठी सन २०१८-१९ पासून राज्यातील सर्व जिल्ह्यांत पोषण अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.