लाभार्थी
अनुसूचित क्षेत्रार्गत अंगणवाडी क्षेत्रातील सर्व गरोदर स्त्रिया व स्तनदा माता व वय वर्ष ७ महिने ते ६ वर्षे वयोगटातील बालके.
वर्णन
भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना राज्यातील १६ जिल्ह्यांतील १११ प्रकल्पातील १४३२२ अंगणवाडयांमार्फत राबविण्यात येते. या योजनेंतर्गत या क्षेत्रातील गरोदर स्त्रिया व स्तनदा माता यांना दररोज रु. ४५/- या खर्च मर्यादेत एक वेळ चौरस आहार दिले जाते. तसेच ७ महिने ते ६ वर्षे वयोगटातील बालकांना आठवडयातील ४ दिवस प्रत्येक लाभार्थीला रु. ६/- किंमतीच्या मर्यादेत केळी / अंडी देण्यात येते.
योजनेची उद्दीष्टे
१) गरोदर व स्तनदा माता यांच्या आरोग्याची काळजी घेणे.
२) कमी वजनाची बालके जन्माला येण्याचे प्रमाण कमी करणे.
३) कुपोषणावर मात करणे, माता व बालमृत्यू रोखणे.
४) स्त्रियांमधील एनीमियाचे प्रमाण कमी करणे.
योजनेचे स्वरुप
१) गरोदर स्त्री व स्तनदा मातांना एक वेळचा चौरस आहार महिन्यातून २५ दिवस दिला जातो. यासाठी प्रति लाभार्थी प्रति दिन सरासरी खर्च रु ४५/- याप्रमाणे करण्यात येतो. (शासन निर्णय क्र.आविवि-०५२३/प्र.क्र.१०४/का-०८, दिनांक १० जुलै २०२३).
२) ७ महिने ते ६ वर्ष वयाच्या बालकांना महिन्यातील १६ दिवस (आठवड्यातून ४ दिवस) मांसाहारी बालकासाठी २ केळी यासाठी प्रति लाभार्थी प्रति दिवस रु ६/- याप्रमाणे खर्च करण्यांत येतो.
३) स्थानिक महिला मंडळ बचत गट / अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत योजनेच्या शासन निर्णयानुसार लाभार्थ्यांना अन्न शिजवून देण्यात येते.
४) आहार समितीच्या बँक खात्यामध्ये DBT द्वारे रक्कम जमा केली जाते.
निकष / कार्यप्रणाली
अंगणवाडी सेविका खालीलप्रमाणे कार्य करतात.
१) अंगणवाडी क्षेत्रातील सर्व गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांची अंगणवाडी केंद्रामध्ये नोंदणी करुन लाभार्थ्याची यादी तयार केली जाते.
२) गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांना लोहयुक्त गोळ्या दिल्या जातात. तसेच, एक वेळचा चौरस आहार देण्यात येतो.
३) नवजात बालकांचे जन्मापासूनचे वजनाची नोंद केली जाते.
४) या योजनेअंतर्गत आहाराचे घटकांची खरेदी अंगणवाडी सेविकेने स्थानिक बाजार पेठेतून करण्यात येते.