Loading...

योजना

ग्राम बाल विकास केंद्र (VCDC)

VCDC
 VCDC.pdf (266.68 KB)

लाभार्थी

० ते  ६ वर्षांमधील अति तीव्र कुपोषित (SAM) बालके

वर्णन

कुपोषणमुक्त महाराष्ट्रासाठी राज्य सरकारच्या धोरणानुसार ० ते ६ वयोगटातील तीव्र कुपोषित बालकांसाठी राज्यात ‘ग्राम बाल विकास केंद्रे’ स्थापन केलेली आहेत. या बालकांना अतिरिक्त आहार पुरवठा, वैद्यकीय देखरेख, पालकांचे पोषणविषयक समुपदेशन या पायाभूत गोष्टींवर भर देण्यात येतो.


अंगणवाडीत ० ते ६ वयोगटांतील सर्व बालकांची वजन, उंची, दंडघेर, पायावरील सूज या निकषावर पडताळणी करण्यात येऊन त्यामध्ये तीव्र कुपोषित आढळून येणाऱ्या बालकांना ग्राम बाल विकास केंद्रात प्रवेश देण्यात येतो. प्रत्येक तीव्र कुपोषित बालक सर्वसाधारण पोषण श्रेणीत आणण्यांसाठी ग्राम बाल विकास केंद्रात सर्वकष प्रयत्न केले जातात.

 

योजनेची उद्दीष्टे

१) बालकांच्या कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी पूरक पोषण आहार देणे.

२) बालकांच्या कुपोषणाच्या समस्या दूर करण्यासाठी आरोग्य सेवा पुरवणे.

३) अति तीव्र कुपोषित बालकांचे कुपोषणापासून मुक्ती करणे


 

योजनेचे स्वरुप 

१) राज्यातील अती तीव्र कुपोषित (SAM) बालकांना कुपोषणातून बाहेर काढण्यासाठी ग्राम/अंगणवाडीस्तरावर ग्राम बाल विकास केंद्र सुरु करण्यात आलेले आहेत.

२) या अंतर्गत कुपोषित बालकांना एका महिन्याकरिता अंगणवाडीत दिवसभर ठेवण्यात येते. 

३) अंगणवाडीत दररोज किमान ६ वेळा बालकांना पौष्टीक आहार देण्यात येतो.

४) याशिवाय अतिरिक्त आहाराच्या स्वरूपात अती तीव्र कुपोषित (SAM) बालकांना Energy Dense Nutritious Foods (EDNF) देण्यात येतो. 

५) आठवड्यातून एकदा ए.एन.एम., १५ दिवसातून एकदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी हे ग्राम बाल विकास केंद्राला  (VCDC) भेट देउन सर्व बालकांची आरोग्य तपासणी करण्यात येते. 

 

निकष / कार्यप्रणाली

अंगणवाडीमधील अंगणवाडी सेविका ६ महिन्यापासून ६ वर्षापर्यंतच्या बालकांची उंची आणि वजन घेऊन अती तीव्र कुपोषित (SAM) बालकांची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी हे बालक अती तीव्र कुपोषित(SAM) श्रेणीतील (category) आहे किंवा नाही याबाबत तपासणी करून खात्री करतात आणी ग्राम बाल विकास केंद्रात (VCDC) दाखल करण्याची गरज असल्यास अती तीव्र कुपोषित (SAM) बालकाला ग्राम बाल विकास केंद्रात (VCDC) दाखल करण्यात येते.

Back to top
Your browser does not support Javascript