लाभार्थी
६ महिने ते ६ वर्षे वयोगटातील बालके, गरोदर व स्तनदा माता, आकांक्षित जिल्हयातील १४ (+) ते १८ वर्षे वयोगटातील किशोरी मुली.
वर्णन
केंद्र शासन पुरस्कृत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील ग्रामीण / आदिवासी / नागरी प्रकल्पातील अंगणवाडी क्षेत्रातील ६ महिने ते ३ वर्षे वयोगटातील सर्वसाधारण व मध्यम श्रेणीतील बालकांना ५०० उष्मांक व १२ ते १५ ग्रॅम प्रथिने युक्त THR अंतर्गत घरपोच आहार व गरोदर स्त्रीया, स्तनदा माता तसेच आकांक्षित जिल्हयातील १४ (+) ते १८ वर्षे वयोगटातील किशोरी मुलींना ६०० उष्मांक व १८ ते २० ग्रॅम प्रथिने युक्त THR अंतर्गत घरपोच आहार दिला जातो. ६ महिने ते ६ वर्षे वयोगटातील तीव्र कुपोषित बालकांना ८०० उष्मांक व २० ते २५ ग्रॅम प्रथिने युक्त आहार दिला जातो. ३ ते ६ वर्ष वयोगटातील बालकांना अंगणवाडी केंद्रात सकाळचा नाश्ता व दुपारचे जेवण (गरम ताजा आहार) महिला बचत गटा मार्फत देण्यात येतो. यामध्ये प्रत्येक जिल्हयात भौगोलिक परिस्थितीनुसार वेगवेगळया पाककृती देण्यात येतात.
योजनेची उद्दीष्टे
१. बालके, किशोरी मुली, गरोदर व स्तनदा माता यांचा आहार विषयक दर्जा सुधारणे.
२. बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी करणे.
३. अति तीव्र कुपोषित बालकांना सर्वसाधारण श्रेणी मध्ये आणणे.
४. बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे.
योजनेचे स्वरुप
लाभार्थी गट
|
उष्मांक
|
प्रथिने
|
प्रति दिन प्रति लाभार्थी दर दि. १/०८/२०१८ पासून लागू
|
आहाराचा प्रकार
|
६ महिने ते ३ वर्षे
|
५००उष्मांक
|
१२ ते १५ ग्रॅम
|
रु ८/-
|
घरी घेऊन जाण्यासाठी आहार
|
३ ते ६ वर्षे
|
५००उष्मांक
|
१२ ते १५ ग्रॅम
|
रु ८/-
|
सकाळचा नाश्ता
|
गरम ताजा आहार अंगणवाडी बसून खाण्यासाठी
|
६ महिने ते ३ वर्षे तीव्र कमी वजनाच्या बालकांसाठी
|
८०० उष्मांक
|
२० ते २५ ग्रॅम
|
रु १२/-
|
घरी घेऊन जाण्यासाठी आहार
|
३ ते ६ वर्षे तीव्र कमी वजनाच्या बालकांसाठी
|
८०० उष्मांक
|
२० ते २५ ग्रॅम
|
रु ८/-
|
सकाळचा नाश्ता
|
गरम ताजा आहार अंगणवाडी बसून खाण्यासाठी
|
रु ४/-
|
घरी घेऊन जाण्यासाठी आहार
|
गरोदर व स्तनदा
|
६०० उष्मांक
|
१८ ते २० ग्रॅम
|
रु ९.५०/-
|
घरी घेऊन जाण्यासाठी आहार
|
किशोरवयीन मुली
|
६०० उष्मांक
|
१८ ते २० ग्रॅम
|
रु ९.५०/-
|
घरी घेऊन जाण्यासाठी आहार
|
निकष / कार्यप्रणाली
१. प्रथम अंगणवाडी क्षेत्रातील लाभार्थ्यांची नोंद अंगणवाडी सेविकेकडून घेण्यात येते.
२. त्यानंतर अंगणवाडी सेविका लाभार्थ्यांची वयोगट निहाय मागणी पर्यवेक्षिकेला दिली जाते.
३. पर्यवेक्षिका कार्यालयातील मागणी नोंदवहीत अंगणवाडी निहाय मागणी नोंदविते.
४. त्यानंतर बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचेमार्फत THR आहार पुरवठयासंदर्भात प्रकल्पाची एकत्रित मागणी पुरवठाधारकास देण्यात येते व गरम ताजा आहार पुरवठयाबाबत प्रकल्पाची मागणी बचत गट निहाय देण्यात येते.
५. मागणीनुसार पुरवठाधारकामार्फत अंगणवाडीस्तरावर घरपोच (THR) आहाराचा पुरवठा करण्यात येतो व त्यानुसार अंगणवाडी सेविका प्राप्त झालेल्या आहारांच्या पाकीटांची संख्या तपासून प्राप्त झालेल्या आहाराची पोहच पुरवठादारास देते. तद्नंतर अंगणवाडी सेविका सदर आहार विभागातील लाभार्थ्यांना पोहचवते. गरम ताजा आहाराच्या बाबतीत स्थानिक बचत गटांकडून अंगणवाडी केंद्रावर प्राप्त होणारा गरम ताजा आहार अंगणावाडीत येणाऱ्या ३ ते ६ वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांना खायला देतात. तसेच, प्राप्त झालेल्या आहाराची पोहच संबंधित पुरवठादारास दिली जाते.
६. प्राप्त झालेल्या THR/ गरम ताजा आहाराची नोंद पोषण ट्रॅकर अँपवर तसेच अंगणवाडी केंद्रामध्ये जतन करुन ठेवलेल्या नोंदवहीमध्ये घेतली जाते.