Loading...

योजना

पुर्व बाल्यावस्थेतील संगोपन व शिक्षण

पुर्व बाल्यावस्थेतील संगोपन व शिक्षण
 ECCE_Policy.pdf (1.4 MB)

लाभार्थी

६ वर्षाखालील बालके 

योजनेचे  वर्णन 

जीवनाची पहिली सहा वर्षे महत्वाची असतात, कारण या वर्षांत शरीराच्या विकासाच्या दर इतर कोणत्याही टप्प्यापेक्षा अधिक वेगवान आहे. जागतिक मेंदू संशोधनाने देखील हे सिद्ध झाले आहे की सुरुवातीचे सहा वर्ष हे मेंदूच्या विकासासाठी महत्वाचे आहेत. पुर्व बाल्यावस्थेतील संगोपन व शिक्षण  (ECCE) अंतर्गत पायाभूत टप्प्यांमध्ये बालकांना आनंदी आणि उद्दीपक वातावरण मिळाल्यास बालकांचा दीर्घकालीन विकास होतो आणि त्यामुळे बालकांच्या विकासाच्या प्रक्रियेत पुर्व बाल्यावस्थेतील संगोपन व शिक्षण (ECCE) चे महत्वाचे योगदान आहे.

 

योजनेची उद्दीष्टे

बाल्यावस्था पूर्व  संगोपन व शिक्षणाचा उद्देश बालकाच्या पूर्ण क्षमतेचा विकास करणे आणि सर्वांगीण विकास व आजीवन शिक्षणाचा पाया घालणे हे आहे.

बाल्यावस्था पूर्व  संगोपन व शिक्षणाची व्यापक उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत:

१) प्रत्येक बालकांस आदर, सुरक्षा व सुरक्षितता तसेच बालकाच्या सकारात्मक स्वसंकल्पना विकसित करणे.

२) प्रत्येक मुलाच्या क्षमतेनुसार शारीरिक आणि सूक्ष्मस्नायूंचा विकास करणे.

३) उत्तम आहार व आरोग्याच्या सवयी, स्वच्छतेच्या सवयी आणि स्वावलंबी कौशल्ये रुजविणे.

४) बालकांना प्रभावी संवाद साधण्यासाठी सक्षम करणे.

५) पंचेंद्रियांचा विकासाला चालना देणे.

६) बौद्धिक विकास व वैज्ञानिक दृष्टिकोण विकसित करण्यासाठी संधी उपलब्ध करून देणे.

७) सामाजिक कौशल्ये, सामाजिक क्षमता आणि भावनिक विकास करणे.

८) सौंदर्यदृष्टी व सर्जनशीलतेचा विकास करणे.

९) घर ते अंगणवाडी केंद्र  आणि अंगणवाडी केंद्रापासून  ते औपचारिक शालेय शिक्षणापर्यंतचा प्रवास सहज व सुकर करणे .

१०) सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास करणे.

 

योजनेचे स्वरुप

बाल्यावस्था पूर्व  संगोपन व शिक्षण (ECCE) हा  खेळ व कृतीआधारित कार्यक्रम आहे. याअंतर्गत बालकांना भाषा, बौद्धिक, सामाजिक, भावनिक आणि शारीरिक विकासासाठी विविध उपक्रमाच्या सहाय्याने अनुभव दिले जातात .

१. जन्म - तीन वर्षे:  काळजी व संगोपन, उद्दीपन, संवाद यावर भर दिला  जातो.
२. तीन - सहा वर्षे: काळजी व संगोपन, शाळापूर्व तयारी यावर भर दिला  जातो.

Back to top
Your browser does not support Javascript