लाभार्थी
सेवानिवृत्त/ राजीनामा/ मृत्यू झाालेल्या अंगणवाडी सेविका/ मदतनीस/ मिनी अंगणवाडी सेविका.
योजनेचे वर्णन
अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती /राजीनामा /मृत्यु / सेवेतून काढून टाकल्यानंतर अथवा मुख्यसेविका /पर्यवेक्षिका या पदावर पदोन्नती होईपर्यत एकरकमी लाभ देण्याबाबतची योजना शासन निर्णय दिनांक ३०/०४/२०१४ अन्वये सुरु करण्यात आली.
उद्दीष्टे
अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती /राजीनामा /मृत्यु / सेवेतून काढून टाकल्यानंतर कल्याणकारी निधी म्हणून एकरकमी लाभ देणे.
योजनेचे स्वरुप
मृत्यू /वयाच्या ६५ व्या वर्षी सेवानिवृत्त होणाऱ्या अंगणवाडी सेविका यांना रु. १,००,०००/- व अंगणवाडी मदतनीस /मिनी अंगणवाडी सेविका यांना ७५,०००/- रु एकरकमी लाभ दिला जातो. राजीनामा/ सेवासमाप्ती होणाऱ्या अंगणवाडी सेविका/ मदतनीस/मिनी अंगणवाडी सेविका यांना त्यांचे शेवटचे मानधन x एकूण सेवा (वर्षांमध्ये) इतकी रक्कम तथा अंगणवाडी सेविका यांना जास्तीत जास्त रु. १०००००/- व अंगणवाडी मदतनीस/ मिनी अंगणवाडी सेविका यांना जास्तीत जास्त रु. ७५,००००/- एकरकमी लाभ म्हणून दिला जातो.
निकष
अ.क्र.
|
लाभाचे निकष
|
लाभार्थी
|
अंगणवाडी सेविका
|
मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस
|
१.
|
वयाची ६५ वर्षे पुर्ण होऊन सेवानिवृत्त
|
रु. १ लाख
|
रु. ७५ हजार
|
२
|
राजीनामा/सेवेतून काढून टाकणे.
|
प्रत्येक पुर्ण सेवा केलेल्या एका वर्षातील त्यावेळी दरमहा घेत असलेले मानधन (जास्तीत जास्त रु. १ लाख) तथापि किमान ५ वर्ष सेवा पुर्ण करणे आवश्यक
|
प्रत्येक पुर्ण सेवा केलेल्या एका वर्षातील त्यावेळी दरमहा घेत असलेले मानधन (जास्तीत जास्त रु. ७५ हजार) तथापि किमान ५ वर्ष सेवा पुर्ण करणे आवश्यक
|
३
|
सेवेत कार्यरत असताना मृत्यू पावल्यास
|
रु. १ लाख त्यांच्या वैध वारसदारास
|
रु. ७५ हजार त्यांच्या वैध वारसदारास
|