Loading...

योजना

आदर्श अंगणवाडी योजना

आदर्श अंगणवाडी योजना

लाभार्थी

महिला आणि अंगणवाडीतील सर्व लाभार्थी (बालके)
 

वर्णन

अंगणवाडी सेविकेमार्फत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत आरोग्य, पोषण आहार व पूर्वप्राथमिक शिक्षण या बाबी पुरविण्यात येतात. याकरीता सदर अंगणवाडी केंद्राचे रुपांतर आदर्श अंगणवाडी केंद्रामध्ये रुपांतरीत करणे ही काळाची गरज आहे. अंगणवाडी केंद्राचे शिक्षण आनंददायी व्हावे, तेथील सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी 'आदर्श अंगणवाडी योजना' आखली आहे.सदर केंद्रांमध्ये मुलांना आनदंदायी वातावरणात पूर्व शालेय शिक्षण, आरोग्य, पोषण आहार देण्यात येतात. तसेच किशोरवयीन मुली व महिलांना कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत प्रशिक्षित करण्यात येते.

 

योजनेचे उद्दीष्टे

१) अंगणवाडयांचा दर्जा सुधारून  व त्यांच्या पायाभूत सोयी -सुविधांमध्ये वाढ करुन त्यांचे आदर्श अंगणवाडीमध्ये रुपांतरीत करणे.

२) अंगणवाडी केंद्राचे शिक्षण व परिसर आनंददायी करणे.

 

योजनेचे स्वरुप

१) अंगणवाडयांचा दर्जा सुधारुन व त्यांच्या पायाभूत योयी-सुविधांमध्ये वाढ करुन त्यांना आदर्श अंगणवाडीमध्ये रुपांतरीत करणेसाठी अंगणवाडीत सौर उर्जा संच, अंगणवाडी इमारतीसाठी शैक्षणिक साहित्य,ई-लर्निंग, पायाभूत सुविधा- LED TV with USB port and Pendrive बालकांसाठी खुर्च्या व टेबल, बालकांसाठी स्वच्छ भारत संच, वॉटर प्युरिुफायर (वीज विरहीत), इमारतची बाहय रंगरंगोटी, सुशोभिकरण, शौचालय दुरस्ती, परिसर स्वच्छता, किरकोळ दुरस्ती इ., बाबींचा समावेश आहे. 

२) सन २०१८-१९ पासून आदर्श अंगणवाडी योजना सुरु करण्यात आली आहे. स्वमालकीच्या इमारतीमधील अंगणवाडयांचे आदर्श अंगणवाडीत रुपांतर करण्यात येत आहे. 

 

निकष / कार्यप्रणाली

राज्यातील ६८ हजार स्वत:च्या इमारती असलेल्या अंगणवाड्यांची प्राधान्याने निवड करण्यात आली आहे. सद्यस्थितीत या योजनेअंतर्गत राज्यातील १६,८८५ अंगणवाडयांचे आदर्श अंगणवाडीत रुपांतर करण्यात आले आहे.

Back to top
Your browser does not support Javascript